Sameer Gaikwad यांच्या आत्महत्येच्या मागचं कारण काय?

पुणे: टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी पुण्यातील वाघोली परिसरातील आपल्या घरात आत्महत्या केली. संध्याकाळी समीरचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेला आढळून आला. प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

समीरच्या (Sameer Gaikwad) आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, समीरने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी सर्वात आधी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड पोहोचला होता. या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर समीरला खाली उतरले आणि नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. गेल्या काही दिवसांपासून तो त्रस्त होता, असे समजते.

मात्र अद्यापही यांच्या आत्महत्येच्या मागचं नेमकं मुख्य कारण काय हे स्पष्ट झाले नाही.